भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......

‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ : पुरुषांचं ‘पुरुषभान’ जागृत करू पाहणारे आणि त्यांना ‘चांगला माणूस’ होण्यासाठी मार्गदर्शन करणारे दिवाळी अंक

‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ हे आगळेवेगळे दिवाळी अंक आहेत. ‘तरुणाईच्या डोक्याला खुराक’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘पुरुष उवाच’मध्ये केवळ पुरुषांचंच लेखन वाचायला मिळतं, तर ‘पुरुष स्पंदनं’मध्ये स्त्री-पुरुष दोन्हींचं. ‘माणूसपणाच्या वाटेवरची ‘पुरुष स्पंदनं’ अशी त्याची टॅगलाईन आहे. ‘पुरुषभान’ जागृत करणारे, त्याला प्रोत्साहन देणारे आणि ते मर्दानगीऐवजी ‘माणूसपणा’कडे कसं झुकेल, यासाठी प्रयत्न करणारे हे अंक आहेत.......

२ एप्रिलच ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून का साजरा करायचा, तर ‘एप्रिल फूल’नंतरचा दिवस म्हणून. ‘असत्य विरुद्ध सत्य’ हे अधोरेखित करण्यासाठी, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत सजग होण्याची कधी नव्हे इतकी गरज आता निर्माण झाली आहे. त्याबाबतची जाणीव-जागृती करण्यासाठी २०१७पासून २ एप्रिल हा दिवस ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून साजरा केला जातो आहे. ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क’ ही संस्था जगभरातल्या अजून काही फॅक्ट चेकिंग संस्थांच्या सहकार्यानं २ एप्रिल हा ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून साजरा करत आहे.......

‘ऋतुरंग’ : करोनाकाळात आणि करोनोत्तर काळातही लढण्याचं बळ देणारा, जगण्याची प्रेरणा देणारा आणि आपल्यातलं स्फूल्लिंग जाग‌वणारा दिवाळी अंक

गेल्या २५-२६ वर्षांत ‘ऋतुरंग’ने आपले ‌वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या वर्षीचा त्याचा विषय आहे – ‘लढत’. करोनामुळे मानवी जीवनावर जे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्याची पार्श्वभूमी या विषयाला आहे. ‘लढत’ हा मानवी जीवनाचा स्थायीभावच आहे. त्यामुळे केवळ करोनाभोवती हा अंक नसून एकंदर माणसांनी वेगवेगळ्या पातळीवर दिलेली लढत या अंकांतून पाहायला मिळते. म्हणजे या लढतीचे वेगवेगळे आविष्कार या अंकातून पाहायला मिळतात.......

अनेक साथींच्या आजारांची माहिती देणारी आणि भविष्यात अशी साथ पुन्हा उदभवू नये यासाठी काय करायला हवं, याचं दिग्दर्शन करणारी पुस्तकं

करोनाच्या बातम्या वाचून, पाहून कंटाळला असाल तर तुम्ही पुस्तकं वाचा. त्याविषयीची इत्थंभूत माहिती देणारी पुस्तकं बाजारात आली आहेत. ती ई-बुकच्या स्वरूपातही उपलब्ध आहेत. कुरिअर सेवा सुरू झाल्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रती घरपोचही मिळू शकतात. वुहानपासून ते जगातल्या आजवरच्या अनेक साथींच्या आजारांची माहिती देणारी आणि भविष्यात अशी साथ पुन्हा उदभवू नये यासाठी काय करायला हवं, याचं दिग्दर्शन करणारी ही पुस्तकं आहेत.......